099200 28859
कांचन कराई - महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालय प्रमाणपत्र धारक

माझ्याबद्दल
कांचन कराई
मी महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचालनालय प्रमाणपत्र धारक व्यावसायिक मोडी लिप्यंतरकार आहे. माझ्या कामाचे स्थायी ठिकाण दादर पारसी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.
मुंबईव्यतिरिक्त, ठाणे, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा व दिल्ली येथील मोडी दस्तऐवजांच्या लिप्यंतराचे कामही मी करत आहे.
मोडी लिपीमध्ये लिहिलेले शिवकालिन, पेशवेकालिन, आंग्लकालिन तथा अर्वाचिन काळातील दस्तऐवज लिप्यंतर करण्याचे ज्ञान मला अवगत आहे.
आंग्लकाळात (British East India Company च्या आमदनीत) लिहिलेले गेलेले इनाम कमिशन बक्षीसपत्र, गहाणखत, दानपत्र, वाटणीपत्र, सात-बारा उतारे, तसेच घरगुती पत्रे, खाजगी पत्रे यांचे मी लिप्यंतर करून दिलेले आहे.
मी मोडी-मराठीमधील दस्तऐवजांचा देवनागरी-हिंदी किंवा रोमन-इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करून देऊन शकते.
आपल्या कुलाच्या मोडी लिपीतील प्राचीन नोंदी (दस्तावेज) वाचून त्याचे देवनागरीमध्ये लिप्यंतर करून घेण्यासाठीदेखील माझ्याशी संपर्क साधता येईल. दस्तऐवजांची संख्या जास्त असल्यास प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन लिप्यंतर करून देता येऊ शकते.
मुंबईबाहेरील अशिलांना लिप्यंतरीत दस्तऐवज कुरीयर अथवा पोस्टाने पाठवण्याची देखील व्यवस्था केली जाते.